नवरात्री विशेष रेसिपी : उपवासाचा हा पदार्थ नक्की ट्राय करा

शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (15:10 IST)
सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहे. अनेक जण देवी आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून उपास करून देवीची आराधना करतात. तसेच पाहिला गेले तर उपवासाचे अनेक पदार्थ आहे. तरी देखील काहीतरी वेगळे बनवावे असे प्रत्येक महिलेला वाटते. याकरिता आज आपण उपवासाचा पदार्थ म्हणजेच बटाटा कीस पाहणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
चार मध्यम आकाराचे बटाटे किसलेले 
दोन चमचे शेंगदाणे कूट  
दोन हिरवी मिरची बारीक कापलेली 
एक चमचा तूप 
अर्धा चमचा जिरे 
चवीनुसार सेंधव मीठ 
एक चमचा लिंबाचा रस 
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली 
 
कृती-
सर्वात आधी बटाटे सोलून स्वच्छ धुवून ते किसून घ्यावे. तसेच किस लागलीच पाण्यात घालावा.अन्यथा त्याचा रंग बदलतो. आता शेंगदाणे भाजून जाडबारीक असा कूट बनवून घ्यावा. 
 
आता एका कढईमध्ये तूप गरम करावे. त्यामध्ये जिरे घालावे व मिरची घालावी. तुम्हाला आवडता असल्यास तुम्ही लाल तिखट देखील घालू शकतात. 
 
आता बटाट्याच्या किस मधील पाणी काढून कढईमध्ये घालावा. व झाकण ठेऊन काही मिनिट शिजू द्यावा. मधून मधून परतवत राहायचे जेणेकरून किस कढईला चिकटणार नाही. 
 
किस थोडासा शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणा कूट आणि सेंधव मीठ मिक्स करावे. व परत काही मिनिट शिजू द्यावे. तसेच आता किस शिजल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपला बटाटा कीस गरम गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा