योग्य माहिती
मुलाच्या बाबतीत सविस्तर माहिती असावी, मुलगा अगदी ओळखीतला असला तरी. यासाठी आपण परदेशात राहणार्या नातेवाईकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता. परदेशातील कुठल्या भागाला आणि कोणत्या कंपनीत कोणत्या पदावर आहे याची खात्री करुन घ्या. ऑफिसद्वारे ही माहिती आपल्याला मिळू शकते. याव्यतिरिक्त तो राहत असलेलं फ्लॅट कोणत्या भागात आहे, त्यासोबत इतर कोणी तर राहत नाही अन्यथा काही वेळेस मुलाची रिलेशनशीप स्टेटस माहित नसल्यामुळे फसवणूक होते.
भारतीय दूतावास संपर्क
भारतात त्यांची प्रॉप्रटी, घरचा पत्ता, व्हिजा, पासपोर्ट या व्यतिरिक्त वोटर रजिस्ट्रेशन कार्ड आणि सामाजिक सुरक्षा नंबरची चौकशी आवश्यक आहे. तसेच गंभीर परिस्थिीत जवळीक बँकेत खाते उघडणे कधीही योग्य ठरेल. सोबतच मुलाच्या शेजारच्यांचे, पोलिस, एंबुलंस आणि भारतीय दूतावासचे नंबर यादीत सामील करावे.
महत्त्वाचे कागदपत्रे
मुलीचे महत्त्वाचे कागदपत्रे जसे पासपोर्ट, व्हिजा, बँकेचे कागदं, प्रॉपर्टी संबंधित कागदं, मॅरिज सर्टिफिकेट आणि महत्त्वाचे फोन नंबर आपल्या विश्वासू माणसांकडे ठेवावे. स्कॅन कॉपीज काढून ठेवाव्या.