पंचतंत्र कहाणी : कबूतर आणि मुंगी

सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (12:56 IST)
उन्हाळ्याचे दिवस सुरु होते. एका मुंगीला खूप तहान लागली होती. ती पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत होती. तिला एका नदी दिसली. नदीला अथांग पाणी होते यामुळे मुंगी नदीत जाऊ शकत न्हवती. यामुळे मुंगी एका दगडावर चढली आणि वाकून पाणी पिऊ लागली. पण वाकून पाणी पितांना तिचा तोल गेला व मुंगी पाण्यामध्ये पडली.
 
त्याच ठिकाणी असलेल्या झाडावर बसलेले एक कबुतर हे सर्व पाहत होते. त्याला मुंगीवर द्या अली. व त्याने क्षणाचा विलंब न करता एक झाडाचे एक पान तोडून मुंगीच्या दिशेने टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि पानाच्या आधारे मुंगी किनाऱ्यावर आली. मुंगी आपला जीव वाचवला म्हणून कबुतराला धन्यवाद म्हणाली व निघून गेली.
 
काही दिवसानंतर त्या नदीजवळ एक शिकारी आला. व त्याने झाडावर बसलेल्या कबुतराच्या दिशेने नेम धरला. पण हे कबुतराला माहिती न्हवते. दुरून येणाऱ्या मुंगीने हे पहिले की, कबुतराचा जीव धोक्यात आहे. ती पटापट आली आणि शिकारीच्या पायाला कडकडून चावा घेऊ लागली. मुंगी पायाला चावल्यामुळे शिकारीच्या पायाला दुखायला लागले. व त्याने धरलेल्या नेमातून गोळी सुटली व झाडाला जाऊन लागली. यामुळे कबुतर सावध झाले व तिथून उडून गेले. असाह्य शिकारी घराच्या दिशेने परतला. शिकारी गेल्यानंतर कबुतर परत झाडावर आले व मुंगीने त्याचा प्राण वाचवला म्हणून मुंगीचे आभार मानले. अश्या प्रकारे इवल्याश्या मुंगीने कबुतराचा जीव वाचवला. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली व दोघे आनंदाने राहू लागले. 
 
तात्पर्य- चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते. निस्वार्थ बुद्धीने केलेली मदत कधीही वाया जात नाही. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती