झोपण्यापूर्वी दुधासोबत 'या' चे सेवन करा, निरोगी रहा

बुधवार, 27 जानेवारी 2021 (08:57 IST)
हिवाळ्यात गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं हे तर सर्वांना माहितच आहे कारण गूळ डिटोक्सिफाइंग एजंट म्हणून कार्य करतं आणि शरीरातील विषारी पदार्थांचे शुद्धीकरण करते. परंतू जेव्हा दुधासह गुळाचे सेवन करतात तेव्हा त्याचा फायदा कितपत वाढतो जाणून घ्या-
 
गरम दूध आणि गूळ यात भरपूर प्रमाणात लोह असते. दररोज याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. अशक्तपणा दूर होतो.
 
गूळ आणि दूध सोबत घेतल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते ज्यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होऊन मऊ राहण्यास मदत होते.
 
यात आढळणारे लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचा सुंदर बनते.
 
दूध आणि गूळ याचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठतेसह इतर आजार दूर होण्यास मदत होते. जेवण्यानंतर थोडासा गूळ घाणे देखील फायद्याचे ठरते. याने रोग प्रतिकारक शक्ती देखील सुधारते.
 
गूळ-दूध हाडांसाठी देखील फायदेशीर आहे, याने स्नायूंचे पोषण होते आणि सांधेदुखी सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
 
याचे सेवन केल्याने दाताचे आरोग्य देखील चांगलं राहते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती