प्राचीन काळात राण्या आपले सौंदर्य वाढविण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करत होत्या. या गोष्टींमधील एक मध आणि दूध आहे. उजळ, चकचकीत, आणि डाग नसलेल्या त्वचेसाठी घरगुती उपचार प्रभावी असतात.
* हिवाळ्यात फायदेशीर आहे मध आणि दूध -
हिवाळ्याच्या हंगामात त्वचा रुक्ष आणि निस्तेज होते. दूध त्वचेला मॉईश्चराइझ करण्याचे काम करतं. तसेच मध त्वचेचा रंग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. दूध आणि मध लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. जेणे करून चेहऱ्यावरील जमलेली धूळ आणि घाण निघेल.
मध आणि दूध सम प्रमाणात थोडसं मिसळून पेस्ट बनवून घ्या. कारण हे पेस्ट चिकट असतं. म्हणून कमी प्रमाणातच चेहऱ्यावर लावणे सोयीस्कर असेल. एक चमचा कच्चं दूध आणि दोन चमचे मध मिसळून पेस्ट बनवून घ्या. आता या पेस्टला चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा. मग 10 ते 15 मिनिटा नंतर चांगल्या प्रकारे कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.