हिवाळ्यात चिक्कीचे सेवन करा, 5 उत्तम फायदे मिळतात

बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (15:20 IST)
आरोग्याच्या बाबतीत हिवाळा चांगला मानला जातो. या हंगामात बहुतेक लोक तीळ, गूळ आणि शेंगदाणे आणि सुकेमेवे पासून बनवलेली चविष्ट गोड चिक्की म्हणजेच गुळाची पट्टीचे सेवन करतात. याचे सेवन केवळ चवीसाठीच चांगले नव्हे तर आरोग्यदायी फायदे देखील असतात. जर आपण हिवाळ्याचा हंगामात या गुळाच्या पट्टीचे सेवन केले तर आपल्याला आरोग्याचे बरेच फायदे मिळतात.
 
1 याचा पहिला फायदा म्हणजे की ही खूप चविष्ट असते, आपल्याला ही खाल्ल्यावर समाधानी वाटत आणि तणावमुक्त देखील वाटत. विश्वास बसत नाही न मग खाऊनच बघा.
 
2 दुसरा फायदा म्हणजे असा की हे हिवाळ्याचा दिवसात शरीरास उष्णता देत आपल्या आरोग्याची काळजी देखील घेऊन आपल्याला आजारी पडू देत नाही. या शिवाय हे हिमोग्लोबिनला वाढविण्यात देखील उपयोगी ठरत.
 
3 हे आपल्याला पोटाच्या समस्येपासून मुक्त करत आणि आपल्या पचनास सुधारतं. बद्धकोष्ठता, गॅस आणि एसिडिटीचा त्रास देखील या मुळे दूर केला जाऊ शकतो.
 
4 हे सर्दी पडसं आणि हिवाळ्यात होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्यांना टाळण्यात मदत करतं. सांधेदुखीच्या त्रासांमध्ये देखील हे फायदेशीर आहे आणि शरीराचे विषारी द्रव बाहेर काढण्यास उपयुक्त आहे.
 
5 हे लोह,प्रथिनं, कॅल्शियम, तांबा, सेलेनियम, झिंक, फोट, नियासिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी ने समृद्ध आहे आणि बऱ्याच पोषक द्रव्यांचा थेट लाभ देण्यास मदत करतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती