हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाणी

गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (12:00 IST)
हिवाळ्यात त्वचा रुक्ष आणि निस्तेज वाटू लागते. कोरड्या त्वचेची योग्यवेळी काळजी न घेतल्यानं हळू हळू समस्या गंभीर होऊ लागते. म्हणूनच त्वचेला थंडी पासून वाचविणे आणि मऊ ठेवणे आवश्यक आहे. जर आपणं आपल्या त्वचेला मऊ आणि तजेल बनवायचे इच्छुक असल्यास तर ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याच्या वापर करून बघा. चला जाणून घेऊ या हिवाळ्यात ग्लिसरीन आणि गुलाबपाणी वापरण्याचे 5 उत्तम फायदे -
 
1 ग्लिसरीनसह गुलाबपाणी मिसळल्याने आपल्या त्वचेला आद्रतेसह चमक देखील मिळते. हिवाळ्यात रुक्ष त्वचा असल्याने त्रास होत असल्यास, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिसळून झोपताना आपल्या त्वचेवर लावून बघा.
 
2 हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावून आपण आपल्या त्वचेला हवामानाशी सहजतेने जुळवून घेऊ शकता. हे आपल्या त्वचेचे कोरडेपणा, मृत त्वचा आणि इतर अनियमितता काढून टाकून कंडीशनींग करतं.
 
3 सरत्या वयाच्या लक्षणांना कमी करून हे आपल्याला तरुण दिसण्यास मदत करतं. गुलाब पाण्यात अँटी-एजिंगचे गुणधर्म असतात आणि ग्लिसरीनचा वापर सुरकुत्या कमी करण्यास मदत करतं.
 
4 हिवाळ्याच्या दिवसात काळजी घेऊन देखील त्वचा निस्तेज आणि सैलसर होते. या पासून वाचण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण आपल्या साठी उपयुक्त आहे. हे आपल्या त्वचेस चकचकीत ठेवण्यास मदत करतं.
 
5 रात्रीच्या वेळी हे मिश्रण वापरल्याने आपली त्वचा थंडीच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती