लग्नाची तयारी करत असाल तर आधी आहारात हे सामील करा

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (12:58 IST)
लग्नाचा विचार मनात येतातच प्रत्येक मुलां-मुलींचा मनात एक शिरशिरी येते. हाच तो खास क्षण असतो ज्याची वाट प्रत्येक मुलगा-मुलगी बघतात. लग्नाचा दिवस प्रत्येक मुलींसाठी खास असतो, या दिवसाची वाट प्रत्येक मुलगी अती उत्सुकतेने बघत असते. प्रत्येक मुलीला असे वाटतंय की आपण आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावे. मग ते आऊटफिट्स असो, मेकअप असो, दाग-दागिने का नसो, लग्न जवळ येतातच प्रत्येक मुलगी तयारीसाठी लागते. तिची धावपळ सुरूच होते. खरेदी साठी जाणे, ड्रेस शिवायला देणं, पार्लरची बुकिंग, या सर्व धावपळीमुळे आणि येणाऱ्या तणावामुळे तिची झोप पुरेशी होत नसते, शिवाय दगदग आणि धावपळी मुळे खाण्या-पिण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते. यामुळे याचा परिणाम थेट तिच्या त्वचे वर पडतो. या मुळे तिच्या चेहऱ्यावरची चमक कमी होऊ लागते. 

जर आपले देखील लग्न जवळच येऊन टिपले आहेत आणि आपल्याला देखील या त्रासापासून वाचायचे असल्यास तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्यामुळे आपल्या त्वचेवर व्यस्त असलेल्या दिनचर्येचा परिणाम होणार नाही आणि चेहऱ्यावरची चमक कमी होण्या ऐवजी वाढतच राहणार. चला तर मग जाणून घेऊ या ही माहिती.
 
एक चांगला आहार आपल्या चेहऱ्यावर चमक आणू शकतो. या साठी आपल्याला आपल्या आहारात काही अश्या गोष्टींचा समावेश करावा जे आपल्या त्वचेला पुरेशे पोषण देईल. या साठी आपण व्हिटॅमिन इ चा समावेश करू शकता. व्हिटॅमिन आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतो. आपण व्हिटॅमिन इ बदामाच्या स्वरूपात घेऊ शकता. याला रात्री पाण्यात भिजत टाका आणि सकाळी न्याहारीत याचे सेवन करावे. याचा नियमित सेवन केल्यानं आपली त्वचा मऊ आणि चमकू लागेल. तसेच त्वचेसह बदाम केसांसाठी देखील फायदेशीर असतं. 
 
हळदीच्या दुधाला आपल्या आहारात समाविष्ट करावे - हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेसाठी चांगले असतात. तसेच हळदीचा वापर केल्यानं त्वचेवर असलेले मुरुमाचे डाग देखील कमी होऊ लागतात आणि त्वचेत चकाकी येते.
 
लग्नाच्या वेळी बहुदा मुलींना तणाव येतो. लग्नाची तयारी, खरेदीला जाणं, ज्या मुळे तणाव येतो आणि पुरेशी झोप देखील होत नाही. आपल्या तणावाला कमी करण्यासाठी आपण डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. 
 
डार्क चॉकलेट चांगले स्ट्रेस बस्टर आहे. याचा सेवन केल्याने आपल्या त्वचेत कॉलेजन ब्रेकडाऊन ला प्रतिबंधित करतं आणि त्वचेला मऊ करण्यात मदत करतं. या व्यतिरिक्त या मध्ये झिंक, आयरन इत्यादी खनिजे असतात. जे आपले रक्त वाढवतात. या मुळे आपल्या केसांची चांगली वाढ होते.
 
फळांचे सेवन करणे - फळांचे सेवन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे एका फळाचे सेवन करावे. या मुळे आपली त्वचा निरोगी राहील आणि आरोग्य देखील चांगले राहील. 
 
लग्नाची तयारी करत आहात आणि आपली इच्छा आहे की त्वचेत चकाकी आणि तेज राहावे. तर फास्टफूड पासून लांब राहा. यामुळे आपल्या आरोग्यास वाईट परिणाम होणारच तसेच फास्टफूडच्या अत्यधिक सेवनाने चेहऱ्यावर मुरूम पुळ्या येऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती