मध वापरून आपण केवळ बऱ्याच रोगांपासून मुक्तच होऊ शकत नाही तर त्वचेला सुंदर बनविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. मधात बरेच पोषक घटक असतात, जे डाग, मुरूम आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. याला नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील चमक वाढते. हे त्वचेच्या छिद्रांमधील दडलेली घाण बाहेर काढतं. आपण याचा वापर स्किन केयर रुटीन मध्ये देखील करू शकता.
* आपल्या हातात एक चमचा मध घ्या आणि ह्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळ 5 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या नंतर गरम पाण्याने धुऊन घ्या. या शिवाय आपली इच्छा असल्यास त्वचेवर 1 मोठा चमचा ताक,1 चमचा मध आणि अंड्यामधील पिवळे बलक मिसळून आपल्या त्वचेवर लावा 20 मिनिटे तसेच ठेवून नंतर पाण्याने धुऊन घ्या.
* त्वचे वरील मृत पेशी काढण्यासाठी बदामाची भुकटी आणि 2 चमचे मध मिसळा. नंतर याला आपल्या त्वचे वर स्क्रब करा आणि ताज्या पाण्याने धुऊन घ्या. बदाम हे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतं, आणि मध हे मॉईश्चराइझ करण्याचे काम करतं.
* जर या दिवसात आपली त्वचा कोरडी पडत असेल तर, एक चमचा मधात एक चमचा ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस मिसळा. या लोशन ला ज्या ठिकाणी त्वचा कोरडी आहे तिथे 20 मिनिटा साठी लावा. नंतर याला साध्या पाण्याने धुऊन घ्या.