थंड हवामानात निरोगी राहण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

बुधवार, 23 डिसेंबर 2020 (13:15 IST)
आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा चांगला मानला जातो कारण तापमानात घट झाल्यामुळे अन्ना मधील उष्णता आपल्या शरीराला उष्ण ठेवते. ह्याचा अर्थ असा आहे की हिवाळ्याच्या हंगामात अन्न सहज पचतं.जेवण्याच्या व्यतिरिक्त जर काही गोष्टींकडे लक्ष दिल्यावर आपण थंड हवामानात निरोगीच राहत नाही तर आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील बळकट होते.
 
1 संतुलित आहार घ्यावा.
कार्बोहायड्रेट शरीरास ऊर्जा देतात, पण आरोग्याच्या दृष्टीने हे पुरेशे नाही. शरीराला चरबी, प्रथिने, फायबर आणि द्रव्ये देखील आवश्यक असतात. हिवाळ्यात तळकट, भाजके, डबाबंद आणि जंकफूड खाण्याची इच्छा वाढते, या कारणास्तव कार्बोहायड्रेटचे सेवन वाढते. दुसरे शारीरिक क्रिया कमी झाल्याने जास्त कॅलरी वापरण्यात येत नाही. यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. या हवामानात हंगामी फळे आणि भाज्यांवर जोर द्यावे. अन्नासह हिरव्या पालेभाज्या, सॅलड आणि सूप घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
 
2 उन्हात बसावे -
पुरेशी विश्रांती घेतल्यावर देखील आपल्याला थकवा जाणवतो? हाडे किंवा स्नायूंमध्ये वेदना होते? जर आपले उत्तर होकारार्थी आहे, तर कदाचित आपल्याला व्हिटॅमिन डी च्या पूरक आहाराची गरज आहे. तज्ज्ञाचा मते सध्या 100 पैकी 70 लोक व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे झुंजतं आहे. हिवाळ्याचा हंगाम या कमतरेला पूर्ण करण्यासाठी चांगली संधी देतो. दुपारी त्वचेला ऊन लागणे व्हिटॅमिन डी च्या दृष्टीने सर्वोत्तम मानले आहे. दुपारी झोपणे व्हिटॅमिन डी ला शरीरातून दूर करत, तर रात्रीची झोप देखील विस्कळीत होते. दुपारी काही वेळ उन्हात अवश्य बसावे.
 
3 व्यायाम करावे -
हिवाळ्यात दररोज व्यायाम करण्याची सवय सोडू नका. नियमितपणे व्यायाम करणे शरीरात आनंदाची जाणीव करण्याऱ्या हार्मोन्सचे स्त्राव करत. नैराश्यात कमी आणतो.हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे शरीराचे वजन वाढण्याची शक्यता वाढते. व्यायाम केल्याने शरीराची लवचिकता वाढते.
 
4 घराच्या आत कपडे सुकवू नका -
तज्ज्ञांच्या मते, घराच्या आत ओलसर कपडे वाळत घातल्यामुळे घरात एसलडीहाइडेट आणि बेंझीन कण पसरतात ज्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचतात. दम्याने ग्रस्त असलेल्या लोकांची समस्या देखील या मुळे वाढते. जरी दमा नसेल, तरी ही ओले कपडे घराच्या आत वाळवल्याने डोकेदुखी, घशात खव-खव आणि डोळ्यात जळजळ होऊ शकते. घरात कपडे वाळवत असाल तर दारे खिडक्या उघडून ठेवा.
 
5 जास्त क्रीम लावू नका -
थंडगार हवेमुळे त्वचा कोरडी होते. त्वचेला आद्रतेची भरपूर आवश्यकता असते, पण ह्याच्या अर्थ असा नाही की आपण अनावश्यक क्रीम आणि लोशन लावावे. जास्त प्रमाणात क्रीम लावल्याने त्वचे वर धूळ -मातीचे कण जमून राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मृत त्वचा चेहऱ्यावर तशीच राहते, या मुळे मुरूम आणि त्वचेची ऍलर्जी होण्याचा धोका वाढतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती