हिवाळ्यात आंबट आणि थंड गोष्टींचे सेवन केल्याने घसा खवखवणे किंवा घसा खराब होऊ शकतो. कोरोना साथीच्या आजारात, आजकाल प्रत्येक जण घसा खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये त्वरितच घसा बरं करण्याची इच्छा बाळगत .जर आपण देखील अशाच प्रकारच्या समस्या पासून त्रस्त असाल तर या पासून वाचण्यासाठी आम्ही आपल्याला काही आयुर्वेदिक टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपला घसा बरं होण्यात मदत मिळेल.
* सकाळी कॉफी ऐवजी हळदीचा चहा प्या -
हळदीला त्याच्या गुणधर्मा मुळे ओळखले जाते. आयुर्वेदात हळदीच्या साहाय्याने बऱ्याच रोगांवर उपचार करणे सहज शक्य आहे. हळद शरीराचे दाह किंवा जळजळ कमी करण्यासह सूज आणि सर्दी पडसं देखील बरे करते. तर मग पुढच्या वेळी चहाच्या ऐवजी आयुर्वेदिक हळद चहा वापरा. आपण घरी देखील हळदीचा चहा बनवून पिऊ शकता. या साठी एका भांड्यात एक कप पाणी घालून त्यामध्ये हळद, आलं आणि लवंग टाकून 10 मिनिटे उकळवा. आपली इच्छा असल्यास या मध्ये दूध घाला अन्यथा आपण याचे सेवन ब्लॅक टी म्हणून देखील घेऊ शकता.