फॅटी लिव्हरसाठी हे योगासन करा नक्कीच फायदा मिळेल

बुधवार, 30 एप्रिल 2025 (21:30 IST)
सध्या खानपानाच्या चुकीच्या सवयीमुळे फॅटी लिव्हरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. पण सकस आहार आणि योगासन केल्याने ही समस्या देखील दूर होऊ शकते. या योगासनांचा नियमित सराव केल्याने यकृताचे कार्य सुधारू शकते. या साठी कोणते आहे हे योगासन आहे जाणून घेऊ या.
ALSO READ: उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या
गोमुखासन
लिव्हरच्या समस्यां साठी गोमुखासन खूपच फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि चयापचय गतिमान करते. याच्या नियमित सरावाने लिव्हर स्वच्छ होते  आणि त्याचे कार्य सुधारते. 
 
मलासन
मलासन केल्याने लिव्हर आतून मजबूत होते आणि त्याचे कार्य सुचारू होते. या आसनामुळे यकृतावर दबाब येतो आणि पचन सुधारते. नियमित सरावाने चयापचय गतिमान होते आणि फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळतो. 
ALSO READ: झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा
धनुरासन 
धनुरासन यकृताचे कार्य वाढविण्यास आणि ते विषमुक्त करण्यास मदत करते. या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होते, ज्यामुळे फॅटी लिव्हर सुधारते. या आसनामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
ALSO READ: पोट स्वच्छ करण्यासाठी हे योगासन अवलंबवा
शलभासन
यकृत आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हे आसन यकृताच्या स्नायूंना बळकटी देते आणि ते विषमुक्त करते. तसेच, ते पोटाचे कार्य सुधारते.
अस्वीकरण: आरोग्य, सौंदर्य काळजी, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर वेबदुनियामध्ये प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ सार्वजनिक हित लक्षात घेऊन तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याची सत्यता पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती