बालपणी दोर उड्या, दोरी ओढण्याची चढाओढ हे खेळ तुम्ही कधी ना कधी खेळले असतीलच. पण मोठे झाल्यानंतर हे खेळ तुम्ही विसरूनही गेला असाल. पण आता ते परत आठवा. कारण या खेळांची आजही तुम्हाला गरज आहे.
ND
ND
आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी दोर उड्या हा उत्तम व्यायाम आहे. उंची वाढवायची असेल, शरीराला वळणदार बनवायचे असेल, वजन कमी करावयाचे असेल तर दोरी उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे. घरातील बुजुर्ग मंडळींनी दोर उड्या खेळण्याचा सल्ला दिला असेल, तर तो तातडीने अमलात आणा. अजूनही वेळ गेलेली नाही. दोरी घ्या आणि चला आपल्या छतावर किंवा घराजवळील बगिच्यात. आणि हो, जाण्याआधी दोरी उड्यांचे नियम आणि फायदे जाणून घ्या.
नियम * दोर उड्या खेळतांना आधी हळू-हळू उड्या मारा. दुसर्या मिनिटापर्यंत तुमचे शरीर गरम होईल. मग तुम्ही जोराने उड्या मारू शकता. 'वॉर्मअप' केल्याशिवाय उड्या मारल्याने शरीरात दुखू शकते. * दोर उड्यांनंतर पाच मिनिटे आराम करा किंवा शवासनात पडून राहा. * अर्ध्या तासानंतर हलका आहार घ्या. उदा. मोड आलेले कडधान्ये, सफरचंद, केळी, दूध, लिंबू-पाणी यांचा समावेश असू द्या. * दोर उड्यांसाठी नॉयलॉनची दोरी वापरा.
फायदे * लवकरात लवकर श्वास घेण्याने फुफ्फुस तंदरूस्त रहाते. * पायाचा सांधे बळकट बनतात. * दोर उड्यांनी पोट आत बाहेर होते. यामुळे पोटावरची साचलेली चरबी कमी होते. * बोटांची काम करण्याची क्षमता वाढते, लेखक आणि कलाकारांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे. * शारीरिक संतुलन वाढते.
हे लक्षात ठेवा * उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी हा व्यायाम करू नये. * सिझेरियननंतर तीन महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम करा. * ज्यांना ह्रदयविकाराचा त्रास असलेल्यांनी हा व्यायाम करू नये.