खरं तर डोळे उघडून शिंकणे कठीणच आहे.आपण प्रयत्न करून देखील असं करू शकत नाही.हे अशक्यच आहे असं म्हणू शकतो.शिंकताना डोळे बंद होतातच . त्या मागील कारण असे की जेव्हा आपल्या नाकात एखादे धुळीचे कण अडकतात तेव्हा आपले मेंदू आपल्या फुफ्फुसांना ते धुळीचे कण बाहेर काढण्याचा संदेश देतात.ते कण बाहेर काढण्यासाठी आपल्या फुफ्फुसांना जास्त प्रमाणात हवा बाहेर फेकावी लागते जी आपल्या नर्व्ह म्हणजे डोळे,चेहरा,तोंड आणि नाकाला नियंत्रित करते.हा संदेश त्या नर्व्ह ला मिळतो आणि शिंक येते आणि शिंकताना अपसुख आपले डोळे बंद होतात.