सरडा रंग कसा काय बदलतो जाणून घ्या

शनिवार, 12 जून 2021 (08:30 IST)
आपण आपल्या अवतीभवती सरडा बघितला असणार आणि हे देखील बघितले असणार की सरडा काही धोका बघितल्यावर त्वरितच आपले रंग बदलतो.आपण कधी हा विचार केला आहे की असं कसं होतं?चला तर मग जाणून घेऊ या.
 
सरडा आपला रंग आपल्या सभोवतालच्या वातावरणानुसार बदलतो.रंग बदलण्याचे हे वैशिष्टये त्याला त्याच्या शत्रूंपासून संरक्षित ठेवतात. सरड्याचे रंग बदलणे हे त्याच्या त्वचेमधील असलेले क्रोमाटोफॉरेस पेशींमुळे होते.हे पेशी त्याचा मेंदूतून नियंत्रित केले जातात. जेव्हा मेंदूला काही धोका जाणवतो तेव्हा मेंदू पेशींच्या संकुचन आणि प्रसरणाला निर्देशित करतो आणि क्रोमाटोफॉरेस पेशी आकार बदलतात आणि या क्रोमाटोफॉरेस पेशींमध्ये तपकिरी, पिवळसर काळा रंगाचे रंजक असतात आणि त्या रंजकांमुळे सरडा आपला रंग बदलतो आणि सभोवतालच्या वातावरणात मिसळून जातो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती