India vs South Africa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे. उभय संघांमधील मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असून हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. भारतीय संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 29 टी-20 सामने खेळले गेले आहेत. भारताने 16 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. प्रोटीजच्या मैदानावर दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर रात्री 7.30 वाजता सुरू होईल.नाणेफेक रात्री 7 वाजता होईल.