IND vs AUS Champions Trophy Semi Final 2025: विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव करून सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला.
यासह, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
आज भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरले होते पण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 265 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले.
विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 49.3 षटकांत 264 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, कोहलीने पुन्हा एकदा पाठलाग मास्टर असल्याचे सिद्ध केले. त्याने 98 चेंडूत 5 चौकारांसह 84 धावा केल्या आणि भारताने48.1 षटकांत 6 बाद 267 धावा केल्या आणि सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी 43 धावांत दोन विकेट गमावल्या. त्यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला.
तथापि, श्रेयस अर्धशतक हुकला आणि त्याने 62 चेंडूत तीन चौकारांसह 45 धावा काढल्यानंतर बाद झाला. श्रेयस बाद झाल्यानंतरही कोहली क्रीजवर राहिला आणि भारताला विजयाच्या जवळ नेले. कोहली शतकाकडे वाटचाल करत होता पण अॅडम झंपाच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. कोहली बाद झाल्यानंतर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने जबाबदारी स्वीकारली. हार्दिकने आक्रमक फलंदाजी केली आणि भारताला विजयाच्या अगदी जवळ आणले. संघाला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना, हार्दिक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
हार्दिकने 24 चेंडूत एका चौकार आणि तीन षटकारांसह 28 धावा काढल्यानंतर बाद झाला. हार्दिक बाद झाल्यानंतर केएल राहुलने मॅक्सवेलच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यासह, भारताने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात पोहोचण्यातही संघ यशस्वी झाला होता. राहुलने 34चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 42 धावा काढल्या, तर जडेजाही दोन धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी दोन, तर बेन द्वारशुइस आणि कूपर कॉनोली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.