ऑस्ट्रेलियात होणार्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एक नवा नियम लागू केला जाणार आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार्या या स्पर्धेत नो बॉल देण्याची जबाबदारी तिसर्या पंचावर दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एका मोठ्या स्पर्धेत हा नियम लागू केला जाणार आहे. याआधी आयसीसीने भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत हा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू केला होता.
या नियमाचा प्रयोग भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेत यशस्वीपणे झाला होता. त्यामुळेच आयसीसीने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने आतापर्यंत 12 सामन्यात असा प्रयोग केला आहे. यात एकूण 4 हजार 717 चेंडू टाकण्यात आले होते. त्यापैकी 13 नो बॉल होते. आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ अल्ड्राइस म्हणाले, सामन्यात अशा प्रकारची मदत घेतली गेल्यास चुका कमी होतील. यामुळे मैदानावरील पंच नो बॉल संदर्भातील निर्णय घेणार नाहीत. अन्य नो बॉल संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मात्र त्यांच्याकडेच असेल.
टी-20 वर्ल्ड कप आणि भारत
आयसीसीने स्पर्धेसाठी दोन ग्रुप केले असून भारती संघाचा समावेश ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील भारताच्या लढती
21 फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया