नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टिल आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पहिल्या कसोटीत ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर युजवेंद्र चहलने निकोल्सला माघारी धाडत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील फलंदाज एकामागे एक परतल्याने संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. अखेरीस अनुभवी खेळाडू रॉस टेलरने कायल जेमिन्सच्या साथीने फटकेबाजी करत आपले अर्धशतक साजरे केले.
केएल राहुल ४ धावांवर बाद, भारत ४ बाद ७१
भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली १५ धावा करून माघारी