सुपर ओव्हरमध्ये किवी एकदाच विजयी

गुरूवार, 30 जानेवारी 2020 (15:34 IST)
अतिशय रोमहर्षक ठरलेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसर्‍या टी-20 सामन्यात विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये पराभव होण्याची न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ नव्हती. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला आतापर्यंत फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
 
2008 ते 2020 या दरम्यान न्यूझीलंड संघाला पाच वेळा सुपर ओव्हरचे सामने खेळावे लागले आहेत. यापैकी 2010मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये एकमेव विजय मिळाला आहे. तर उर्वरित वेस्ट इंडीज, श्रीलंका, इंग्लंड आणि भारताविरोधात खेळलेले सामने त्यांनी गामावले आहेत.
 
टी-20 क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 13 सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. यात सर्वाधिक सामने खेळणचा मान न्यूझीलंडने पटकावला आहे. मात्र, त्याच वेळी सर्वाधिक सामने देखील त्यांनीच गामाविले तर दुसरीकडे भारताने न्यूझीलंडविरुद्ध झालेला एकमेव टी-20 सामना आतापर्यंत सुपर ओव्हरमध्ये खेळला आहे आणि हा सामना जिंकून विराटसेनेने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती