भारतानंतर यजमान संघाला आयसीसीने केला दंड

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (14:34 IST)
मालिकेत 0-5 ने पराभव स्वीकाल्यानंतर न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत दमदार पुनरागम केले. 3 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 0-2 ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या सामन्यात बाजी मारल्यानंतरही न्यूझीलंड संघाला आसीसीने दंड ठोठावला आहे. षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी न्यूझीलंडच्या मानधनातून 60 टक्के रक्कम कापून घेतली आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रक काढत यासंदर्भात माहिती दिली. 
 
सामनाधिकारी आणि दोन पंचांसमोर झालेल्या सुनावणीत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने आपली चूक मान्य केली. याआधी भारतीय संघालाही न्यूझीलंड दौर्‍यात सलग 3 सामन्यांत षटकांची गती कायम न राखल्यामुळे दंडाला सामोरे जावे लागले आहे.
 
दरम्यान, एकदिवसीय मालिकेत व्हाइटवॉश टाळण्यसाठी भारताला अखेरच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मंगळवारी अखेरचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती