मुलीचा आरोप आहे की ती फेब्रुवारी2023 मध्ये तिच्या मैत्रिणींसोबत वडोदरा येथे गेली होती, जिथे तिची शिवालिक शर्माशी भेट झाली. मग दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. ऑगस्ट 2023 मध्ये, शिवालिक आणि त्याचे कुटुंब जोधपूरला आले आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर, शिवालिक आणि मुलीचे लग्न ठरले.
गेल्या वर्षी27 मे रोजी शिवालिक मुलीच्या घरी आला होता जिथे कोणीही नव्हते. मुलीने नकार देऊनही, शिवालिकने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्यावर 3 जून पर्यंत अनेकदा त्याने बलात्कार केला.
शिवालिक मुलीला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन येथे घेऊन गेल्याचा आरोप आहे. लग्नाच्या आश्वासनाच्या आधारे शिवालिकने जोधपूरसह अनेक ठिकाणी मुलीशी संबंध ठेवले, असा आरोप आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये शिवलिकने लग्नाबद्दल बोलण्यासाठी मुलीला वडोदरा येथे बोलावले होते.शिवालिकच्या पालकांनी तिला अनेक वेळा फटकारले. तसेच साखरपुडा मोडल्याबद्दल माहिती दिली. मुलीच्या कुटुंबालाही फोनवरून याची माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर मुलीला घराबाहेर हाकलून लावण्यात आले.या वरून तरुणीने शिवालिकच्या विरुद्धच्या तक्रार दाखल केली.
शिवालिकने रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीने शानदार कामगिरी केली. 2018मध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याने 18 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 43.48 च्या सरासरीने 3 शतके आणि 5 अर्धशतकांसह1087 धावा केल्या. एकेकाळी तो भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार मानला जात असे. या कामगिरीच्या आधारे, मुंबई इंडियन्सने त्याला 2024 मध्ये 20 लाख रुपयांना खरेदी केले. तथापि, त्याने अलिकडच्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले.