उत्कृष्ट कारकिर्दीनंतर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून निवृत्त

बुधवार, 29 जून 2022 (12:47 IST)
आपल्या चमकदार नेतृत्व कौशल्याने इंग्लंडला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटच्या शिखरावर नेणारा कर्णधार इऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून निवृत्ती घेतली.
2015 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या निराशाजनक अपयशानंतर मॉर्गनने पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये निर्भय आणि आक्रमक दृष्टिकोन स्वीकारून संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली, इंग्लंड 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे चॅम्पियन बनले आणि त्यांनी प्रत्येक मोठ्या संघाविरुद्ध मालिका विजयाची चव चाखली. त्यांच्या यशाची टक्केवारी 60 च्या आसपास आहे. 
 
इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले: "सर्व महान खेळाडू आणि कर्णधारांप्रमाणेच, त्याने स्वतःसाठी आणि पुढील पिढ्यांसाठी खेळण्याची पद्धत बदलली आहे. त्याचा खेळातील वारसा पुढील अनेक वर्षांपर्यंत जाणवेल.” मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने वनडेमध्ये तीन मोठे स्कोअर केले आहेत.
 
“हा निःसंशयपणे माझ्या कारकिर्दीचा सर्वात आनंदाचा अध्याय आहे. निवृत्तीचा निर्णय सोपा नव्हता पण मला विश्वास आहे की माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे. असे मार्गन म्हणाले.
 
मॉर्गन 2010 मध्ये जागतिक विजेतेपद जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे देखील भाग होते, त्यांनी T20 विश्वचषक विजेतेपद भूषवले. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम 2016 च्‍या टी-20 विश्‍वचषकाच्‍या अंतिम फेरीत पोहोचली होती. मॉर्गनच्या नावावर सर्वाधिक एकदिवसीय 225) आणि टी20 (115) सामने खेळण्याचा विक्रम आहे आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत
 
.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती