‘सैराट’च्या प्रचंड यशानंतर तब्बल दिड वर्षानंतर ‘बॉयझ्’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आणि अजुनही सलग चौथ्या आठवड्यात थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत. कॉलेजवयीन प्रेक्षकवर्गाला लक्ष करून चित्रपट तयार केला आणि त्या प्रेक्षकवर्गापर्यंत त्यांना आवडेल त्या पद्धतीने सादर करून यश संपादन केले. हा चित्रपट यशस्वी करण्याचा मार्ग बॉयझचे निर्माते राजेन्द्र शिंदे, दिग्दर्शक विशाल देवरूखकर आणि प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते यांनी आखला आणि यश मिळाले. पण, या सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो चित्रपट वितरणाचा… जे मराठी चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचे आणि कठीण आहे. ती जबाबदारी पिकल एंटरटेनमेन्टच्या समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी यांनी समर्थपणे पेलली. त्यामुळे बॉयझ च्या यशात पिकल एंटरटेनमेन्टच्या वितरण प्रणालीची मोठी भूमिका आहे.