या मराठमोळ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी झाला. महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच घेतले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.त्यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं आणि त्यांनी मोठी झाल्यावर त्यांचे स्वप्न पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९७८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि १९८२ च्या चित्रपटाने त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.
रोहिणी हट्टंगडी या त्यांच्या काळातील एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांनी समांतर चित्रपटांसोबतच व्यावसायिक चित्रपटांमध्येही समान काम केले. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केले. मराठी टीव्ही मालिकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका केल्यात. 'चार दिवस सासूचे', 'स्वामीनी' या मालिकांमधून त्यांनी वेगळीच प्रतिमा उमटवली.तसेच त्यांनी रंगभूमीवरही मोठ्या प्रमाणात काम केले.