आज्जीबाई जोरात पन्नाशीत!! तीन महिन्यात सुवर्ण महोत्सवी प्रयोग!!

रविवार, 11 ऑगस्ट 2024 (15:45 IST)
महाराष्ट्रातील नाट्य रसिकांमध्ये धुमाकूळ घालत असलेलं पहिलं एआय महा बालनाट्य 'आजीबाई जोरात' आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. 
 
बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा उपक्रम म्हणून दाखवू लागल्या आहेत. शिवाय वेगवेगळ्या महोत्सवांमध्येही नाटकाला जोरदार मागणी आहे. 
 
याबद्दल बोलताना नाटकाचे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले की, "अनेक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे मराठीतील पहिलं ब्रॉडवे म्युझिकल अशी पावती आम्हाला दिली आहे. अनेक मुलांनी नाटक पाहून मराठी लिहायला वाचायला सुरुवात केली स्क्रीन टाईम कमी केला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय अनेक पालक नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी भेटवस्तू, खायचे पदार्थ, पुस्तकं आपुलकीने घेऊन येतात, त्या प्रेमानेही भारावून जायला होत आहे.
 
मराठी रंगभूमीची ताकद सर्वदूर पोचावी म्हणून हे नाटक लवकरच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, इतर राज्य आणि देशाबाहेरही न्यायचा आमचा मानस आहे, त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत."
 
येत्या १४ आणि १५ ऑगस्ट रोजी या नाटकाचे सुवर्ण महोत्सवी प्रयोग पुण्यामध्ये होणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती