एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की, ती किशोरवयात खूप खोडकर होती, त्यामुळे तिची आई बबिता कपूरने तिला डेहराडूनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. बरखा दत्तच्या एका मुलाखतीत तिच्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना करीना कपूरने सांगितले होते की, एकदा एका मुलाला भेटल्यामुळे ती किशोरवयात अडचणीत आली होती.
आपल्या किशोरवयीन दिवसांची आठवण करून देताना करीना म्हणाली की तिची बहीण करिश्माने जे केले तेच तिला नेहमी करायचे होते. तिची मोठी बहीण करिश्माला तिच्या मैत्रिणींसोबत फिरण्याची परवानगी होती पण करीना थोडी खोडकर होती म्हणून तिच्या आईने तिला कुठेही जाऊ दिले नाही. त्यावेळी तिला एक मुलगा आवडला आणि त्याला भेटायला जायचे होते, पण तिच्या आईने तसे करण्यास नकार दिला.
करिनाने असेही सांगितले की, आई तिच्या खोलीत फोन लॉक करायची. बेबोने सांगितले होते की तिला तिच्या मित्रांसोबत जाऊन मुलाला भेटायचे होते. एके दिवशी तिची आई डिनरसाठी गेली होती. करीनाने आईच्या खोलीचे कुलूप तोडले आणि खोलीत जाऊन फोन घेतला आणि प्लॅन केला आणि घरातून पळून गेली.