पुष्पा 2 ने फक्त वीकेंडलाच नाही तर आठवड्याच्या दिवसातही आपली जादू दाखवली आहे. सुरुवातीच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने 15 व्या दिवशी 12.6 कोटींची कमाई केली आहे. कंपनीच्या चित्रपट निर्मात्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की "व्यावसायिक सिनेमाची एक नवीन व्याख्या. बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला गेला. 'पुष्पा-2 द रुल'ने जगभरात 1508 कोटींची कमाई करून हा आकडा पार करणारा सर्वात जलद भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट बाहुबली २ आणि दंगलचे रेकॉर्ड तोडणार आहे. कारण बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर 1790 कोटींची कमाई केली होती आणि दंगलने 2070 कोटींची कमाई केली होती. पण, सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल'ने आणखी एक टप्पा गाठला आहे.