बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आजही त्याच्या हिट चित्रपटांसाठी आणि नृत्यशैलीसाठी ओळखला जातो. 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा प्रसिद्ध अभिनेता गोविदा आज 21 डिसेंबर रोजी आपला 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याचे चाहते आणि सेलिब्रिटीही त्याचे अभिनंदन करत आहे. गोविंदा हा बॉलिवूडमधील हिरो नंबर वन अभिनेता आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला.
गोविंदाने अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर 1980 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यानंतर तो स्वर्ग, इलजाम, खुदगर्ज, जीते हैं शान से यांसारख्या चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत साईड ॲक्टरच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर 1986 मध्ये कठोर परिश्रमानंतर तो मुख्य अभिनेता म्हणून दिसला. या चित्रपटाचे नाव होते 'लव्ह 86'.
गोविंदाचे हिट चित्रपट-
गोविंदाच्या 'आँखे', 'राजा बाबू', 'दुल्हे राजा', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'अनारी नंबर 1', 'जोडी नंबर 1', 'हसीना मान जायेगी' आणि 'साजन', 'चले ससुराल'सह अनेक चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला होता. पण त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात वास्तव्यास होते. त्यांचे वडील अरुण आहुजा हे 1940 च्या दशकातील संघर्षशील अभिनेते होते आणि त्यांची आई निर्मला देवी शास्त्रीय गायिका आणि अभिनेत्री होत्या.