टोमॅटो दिल्लीत 100 ते 140 रुपये किलो, तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये 160 रुपये किलो, गाझियाबादमध्ये 150 रुपये किलो आणि कानपूरमध्ये 100० रुपये किलोने मिळत आहे. घाऊक विक्रेते सांगतात की, गेल्या महिन्यात मंडईत टोमॅटोचा भाव 8-10 रुपये किलो होता, तर आता भाजीपाला बाजारात टोमॅटोचा भाव 70-80 रुपये किलो आहे. टोमॅटो खरेदीसाठी मंडईत आलेले किरकोळ व्यापारी सांगतात की, आता लोक पूर्वीपेक्षा कमी टोमॅटो घेत आहेत.
महिनाभरापूर्वी टोमॅटो 10 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, मात्र साठवणुकीची सोय नसल्याने शेतकरी टोमॅटो साठवू शकत नाहीत. काढणीच्या वेळी टोमॅटोचे भाव खूपच कमी होतात. पीक संपल्याबरोबर टोमॅटोचे भाव गगनाला भिडायला लागतात. शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअर्स मिळाले, तर टोमॅटो वर्षभर साठवून वापरता येतील.
दरम्यान पुढील महिनाभर टोमॅटोचे दर वाढतच राहणार असल्याचे टोमॅटोच्या घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पीक बाजारात आल्यानंतरच भाव खाली येतील. मात्र, टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघेही हैरान झाले आहेत.