Tomato History : 200 वर्षांपूर्वी टोमॅटो विषारी मानले जात होते, टोमॅटोचा इतिहास जाणून घ्या
बुधवार, 28 जून 2023 (10:54 IST)
आज प्युरी, चटणी, केचअप, पेस्ट, भाजी इत्यादीसाठी प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला लाल टोमॅटो आज महाग झाल्याने सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी 20-30 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज अचानक 100 रुपये किलोने विकला जात आहे.
टोमॅटो हे आपण दररोज खातो. खाद्य पदार्थात टोमॅटो एक महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो. हे खाद्यपदार्थ कुठून आले, त्याची उत्पत्ती कुठून झाली टोमॅटोच्या इतिहासाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या.
सुमारे 200 वर्षांपूर्वी टोमॅटो हे विषारी मानले जायचे.विशेषतः अमेरिकेच्या लोकांमध्ये टोमॅटो बद्दल खूप भीती होती. एवढेच नव्हे तर ह्याचा उत्पदनावर बॅन लावण्यासाठी एकाने न्यायालयात याचिका दाखल केली .टोमॅटोच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ या.
कांदा आणि टोमॅटो या अशा भाज्या आहे ज्या जेवणाची चव वाढवतात. घरात कांदा आणि टोमॅटोचा सर्रास वापर केला जातो. काही लोक कांद्याचा वापर जेवणात करत नाही. पण टोमॅटोचा वापर घरात जेवणात केला जातो. लोक टोमॅटोचे सूप बनवतात आणि हिवाळ्यात त्याचे सेवन केले जाते. सॅलेड म्हणून टोमॅटोचा वापर केला जातो. आजच्या काळात टोमॅटो हे स्वयंपाकघरातील आवश्यक घटक मानले जाते. पण एकेकाळी टोमॅटोला विषारी मानले जात होते. भारतातच नव्हे तर परदेशात देखील टोमॅटोचा लाल रंग बघून लोक घाबरायचे.लोकांमधील संभ्रम तेव्हा दूर झाला जेव्हा 28 जून 1820 रोजी टोमॅटो बिनविषारी भाजी असल्याचे घोषित केले.
टोमॅटोचा इतिहास -
काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन सी पोटेशियम, मॅग्नेशिअम, फास्फोरस सारखे पोषक घटक आढळतात. टोमॅटो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. टोमॅटोचे अनेक फायदे आहे. पण 200 वर्षांपूर्वी टोमॅटो हे विषारी मानले जायचे त्याचे कारण टोमॅटोमध्ये शिसेची मात्रा जास्त प्रमाणात आढळते या कारणास्तव टोमॅटो विषारी भाजी मानायचे. मुलांनी टोमॅटो खाल्ल्याने त्यांचा मृत्यू होऊ शकतो असा समज होता. शेतकरी टोमॅटोची लागवड करत नव्हते.
त्याच्या लालरंगामुले देखील लोकांमध्ये भीती होती. लाल हा रंग धोकादायक मानला आहे. अमेरिकी शल्य चिकित्सक जॉन गेराड यांनी टोमॅटोची लागवड केली त्यात त्यांना टोमॅटिन टॉक्सिन कमी प्रमाणात आढळले. लोकांची धारणा होती की टोमॅटिन हा एक विषारी तत्व आहे. त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
लोकांमधली भीती घालवली. त्यांनी सांगितले की टोमॅटोमुळे जीव जाणार नाही. तरीही लोकांनी टोमॅटो वापरायला नकार दिला. एकाने न्यायालयात टोमॅटोच्या बंदी साठी याचिका दाखल केली. विशेष म्हणजे न्यायालयाने टोमॅटोला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. असं वाटले की टोमॅटो न्यायालयात हजर होणार नाही आणि टोमॅटोवर कायमचे प्रतिबंध लागणार. मात्र न्यायालयात टोमॅटोची हजेरी लागली आणि टोमॅटोने खटला जिंकला. त्याच्यावरील लावलेले प्रतिबंध काढण्यात आले.
28 जून 1820 रोजी न्यू जर्सीच्या सेलम न्यायालयात टोमॅटोसाठीचा खटला सुरु असताना टोमॅटोच्या दुष्परिणामाबद्द्दल लोक सांगत असताना कर्नल रॉबर्ट गिबन जॉन्सन न्यायालयात आपल्या हातात टोमॅटोची पिशवी घेऊन येतात आणि न्यायालयात टोमॅटो खायला सुरु करतात लोकांना वाटते की आता यांचा जीव जाणार पण पिशवीतील सर्व टोमॅटो खाल्ल्यावर देखील त्यांना स्वस्थ पाहून लोकांना आश्चर्य होतो. आणि नंतर ते टोमॅटोच्या फायद्यांबद्दल सांगतात. असा प्रकारे टोमॅटोवरील खटला टोमॅटो जिंकून त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊन लोकांच्या स्वयंपाकघरात पोहोचला.
भारतात टोमॅटोचे आगमन कधी झाले
पुर्तगाळी शोधकर्ता टोमॅटो घेऊन 16 व्या शतकात भारतात पोहोचले. त्यावेळी भारतीयांनी प्रथम टोमॅटोची चव चाखली. आणि तेव्हापासून आजतायागत टोमॅटो भाजीतील मुख्य घटक मानले जाते.
आज टोमॅटोचे उत्पादन भारत, तुर्की, चीन, अमेरिका, इराण, स्पेन, इजिप्त, इटली, ब्राझील आणि मेक्सिको इत्यादीसह जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये केले जात आहे. आज टोमॅटोची सर्वाधिक लागवड राज्यांमध्ये केली जाते.
आज टोमॅटोचे दर वेगाने वाढत आहे. सध्या टोमॅटोचे दर प्रतिकिलो 100 ते 120 रुपये झाले आहे. पावसाळा आणि उकाड्यामुळे टोमॅटोची शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर पडत आहे. टोमॅटोच्या नवीन लागवडी नंतर टोमॅटोचे दर कमी होतील.