बँकेने मोठ्या प्रमाणातच ठेवींवर(2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांवर) देखील व्याजदरांमध्ये 0.5 टक्क्यांनी कपात केली आहे. SBI ने मे मध्ये दुसऱ्यांदा मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात केली आहे. या आधी बँकांनी 12 मे रोजी आपले ठेव दरांमध्ये कपात केली होती. नवे व्याजदर बुधवार पासून लागू करण्यात आले असून सर्व नवीन ठेवी आणि ठेवींच्या परिपक्व्तेनंतर नूतनीकरणावर लागू होणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्व कालावधीच्या किरकोळ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरात 0.4 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुकतेच सांगितले की सध्याच्या परिस्थितीला बघून व्याजदरांमध्ये कपात करण्यात येईल. ते म्हणाले की व्याजदरामधील ही कपात कर्जदार आणि ठेवीदार दोघांसाठीच असणार.