LIC ने सादर केली संशोधित PMVVY योजना, बदल जाणून घ्या

बुधवार, 27 मे 2020 (16:13 IST)
भारतीय जीवन महामंडळाने LIC ने संशोधित पंतप्रधान वय वंदन योजना (PMVVY) सादर केली. या पेन्शन योजनेसाठी केंद्र सरकार अनुदान देते. सुधारित योजना मंगळवार पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून 
 
केंद्र सरकारने या योजनेत सुधारणा करून 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगट असणाऱ्यांसाठी दर मध्ये बदल केले आहेत. या योजनेला चालविण्याचे सर्व हक्क LIC कडे असणार. 
 
LIC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सुधारित योजना खरेदीसाठी मंगळवार पासून 3 वर्षासाठी म्हणजे मार्च 2023 पर्यंत उपलब्ध असणार. 
 
कंपनीने सांगितले की योजना ऑफलाईन तसेच वेबसाईट वरून ऑनलाईन देखील खरेदी करता येऊ शकते. योजनेची मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षे आहेत. या मध्ये पहिल्या वर्षी 7.40 टक्केचे सुनिश्चित प्रतिफळ देणार आहेत. 
 
या योजनेत काही ठराविक प्रकरणांमध्ये प्रीमॅच्योर विड्रॉल (अकाळी पैसे काढण्याची) सुविधा देखील उपलब्ध आहेत. 
 
या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांचा जोडीदारास कोणत्याही गंभीर आजारासाठी ही सुविधा मिळते. तथापि, अश्या परिस्थितीत खरेदी किमतीच्या 98 टक्के सरेंडर मूल्य परत केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती