टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच 'ही' वेळ आली

सोमवार, 25 मे 2020 (22:06 IST)
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरता टाटा समुहावर इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ आली आहे. टाटा सन्सचे चेअरमन आणि सहाय्यक कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात २०% कपात केली आहे. 
 
टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा सन्स समूहातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त फायदा मिळवून देणारी कंपनी आहे. सर्वात प्रथम टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. तसेच इंडिया हॉटेल्सने याआधीच सांगितले की ते वरिष्ठांच्या या तिमाहीतील पगाराचा एक भाग कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून देणार आहेत.
 
त्याचप्रमाणे टाटा समुहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी देखील कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार आहे. 
 
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे. यावेळी व्यवसाय वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे टाटा ग्रुपमधील एका सीईओने सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती