आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी आल्यामुळे देशांतर्गत बाजारात गुरूवारी सोने दरात 150 रुपांनी वाढ झाली तर चांदीचे दर 140 रुपांनी वाढले. गेल्या दोन दिवसाच्या सोनेचांदीच्या घसरणीनंतर दर पुन्हा पूर्ववत येण्याची अपेक्षा बाजारपेठेत व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर प्रति 28.34 ग्रॅमला 1560 डॉलर तर चांदी दर प्रति 28.34 ग्रॅमला 17.70 डॉलर इतके झाले आहे.