Thane News: चेन्नई पोलिसांकडून जफर गुलाम इराणी नावाच्या चेन स्नॅचर एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. मृत जफरवर साखळी हिसकावल्याचा आरोप होता. तो मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील आंबिवली भागातील रहिवासी होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जफरने पोलिसांवर गोळीबार केला होता. जफर 'इराणी बस्ती'चा होता. ही वस्ती १९ व्या शतकात इराणहून आलेल्या लोकांनी वसवली होती. साखळी स्नॅचिंगच्या घटनांमुळे या वसाहतीची प्रतिमा मलिन झाली होती. जफरवर ठाण्यात चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल होते. त्याला यापूर्वीही मकोका अंतर्गत अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वीच त्याला जामिनावर सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जफरने त्याच्या साथीदारांसह चेन्नईमध्ये सहा महिलांकडून साखळ्या हिसकावून घेतल्या होत्या. पोलिसांनी त्याला चोरीची दुचाकी जप्त करण्यासाठी नेले होते तेव्हा त्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, जफरवर ठाण्यात चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल होते. त्याला २०१६ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी त्याला जामिनावर सोडण्यात आले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जफरवर केवळ ठाण्यातच नाही तर राज्य आणि देशाच्या इतर भागातही चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहे.