मिळालेल्या माहितीनुसार भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानेवारी २०२० मध्ये त्यांना दिलेले पत्र सादर करण्याचे आदेश आयोगाने ठाकरे यांना दिले आहे. हे कागदपत्र २२ सप्टेंबरपर्यंत आयोगासमोर सादर करावे लागेल.
शरद पवार यांनी कागदपत्रे न दिल्यानंतर अॅड. कदम यांनी आयोगाला सांगितले की, जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ते पत्र असेल तर त्यांना ते सादर करण्यास सांगितले पाहिजे. यावर आयोगाने अॅड. आंबेडकर यांची मागणी मान्य केली आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली. आयोगाने हे पत्र किंवा संबंधित कागदपत्रे २२ सप्टेंबरपर्यंत सादर करावीत असे स्पष्ट केले आहे.