पुण्यात न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या

बुधवार, 15 ऑक्टोबर 2025 (20:58 IST)
पुणे शहरातील एका न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या  मजल्यावरून उडी मारून एका 61 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना बुधवारी सकाळी 11:45 च्या सुमारास शिवाजीनगर येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत घडली.
ALSO READ: पुण्यात एनडीएच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यातील वडकी परिसरातील रहिवासी यशवंत जाधव यांनी न्यायालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, असे शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 
ALSO READ: पुणे हादरले! कोंढव्यात 'दहशतवादी?
पोलिसांना यशवंत यांच्या मृतदेहा जवळून चिट्ठी सापडली आहे त्यात घरगुती कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. 1997 पासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादावरून तसेच दीर्घकाळापासून भोगत असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल घेतले. 
ALSO READ: पुणे-दिल्ली विमान राजधानीत सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी पक्ष्याला धडकले
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
जाधव यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती