पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. साडेपाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपरखेड परिसरात घबराट पसरली आहे. चिमुकली तिचे आजोबा यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी जात असताना जवळच्या उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून तिला आत ओढले. ही घटना पाहून आजोबा यांनी तातडीने मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.