अनोखी ऑफर, मोफत मिळवा दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन

गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)
आष्टी येथील एका मोबाईल दुकानदाराने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी ऑफर दिली आहे. कोणताही मोबाईल कंपनीचा नंबर जिओमध्ये पोर्ट करा आणि त्यावर दोन किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन मोफत मिळवा. आष्टी शहरातील बीड-आष्टी रोडवर समीर पोकळे यांचं रेणुकाई मोबाईल शॉपचं दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्कीम देतात. 
 
“लोकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच आम्ही ग्राहकांना नवनवीन ऑफर देत असतो. ऑफर दिल्यामुळे आम्ही नेहमी चर्चेत राहतो. मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे येतो. यंदाही आम्ही चिकन फ्री देण्याचे ठरवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत. तसेच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज किमान दहा किलो चिकन आम्ही देत आहोत”, असं दुकानदार समीर पोकळे यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती