बजाज सीटी 100, बजाज प्लॅटिना नव्या व्हेरिएंटमध्ये लाँच

शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (15:42 IST)
बजाज प्लॅटिना शहरापासून ते छोट्या-छोट्या गावांपर्यंत लोकप्रिय आहे. कंपनी गेल्या एक वर्षांपासून परवडणारी दुचाकी सीटी 100 वर काम करत होती. चाचणी करतानाही हीदुचाकी दिसून आली होती. कंपनीने आता बजाज सीटी 100 आणि बजाज प्लॅटिना या दोन मध्यम किमतीच्या दुचाकी नव्या  व्हेरिएंटमध्ये लाँच केल्या आहेत. दोन्ही दुचाकी बीएस 6 उत्सर्जन मानकांची पूर्तता करणार्‍या इंजिन व्हेरिएंटमध्ये आहेत. बीएस 4 इंजिनच्या तुलनेत हे नवीन मॉडेल 7 हजार रुपयांनी महाग आहे.
 
बजाज सीटी 100 च्या बीएस 6 व्हर्जनची किंमत 40 हजार 794 रुपयांपासून पुढे आहे. यापूर्वी ही किंमत 33 हजार 402 रुपये होती. तर बीएस 6 प्लॅटिनमची किंमत 47 हजार 264 रुपयांपासून पुढे आहे. किक स्टार्ट मॉडेलची ही किंमत आहे. सेल्फ स्टार्ट मॉडेलची किंमत 54 हजार 797 रुपये आहे.
 
या दोन्ही दुचाकींमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन सिस्टिम असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मायलेज मिळण्यास मदत होते. शिवाय मेंटेनन्सही सुलभ होते. दोन्ही दुचाकींच्या लूक आणि डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
या दुचाकीमध्ये पहिल्याप्रमाचे 102 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. इंजिन पॉवर आऊटपुट आणि टॉर्क पहिल्याप्रमाणेच 7.7 बीएचपी आणि 8 एनएम आहे. 4 स्पीड गिअरबॉक्समध्ये ही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही दुचाकीनंतर कंपनी पुढच्या काही आठवड्यात इतर दुचाकीही बीएस 6 व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती