दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.