थायलंडमधील अद्‌भुत रोबोट इमारत

गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (00:04 IST)
अनोखेपण व नवलाईने भरलेल्या जगामध्ये काहीही होऊ शकते. थायलंडमधील एक इमारत विज्ञानाचा असाच अद्‌भुत व चमत्कारिक नमुना ठरली आहे. इमारत म्हटलीकी एक कायमस्वरुपी एकजागीच राहते, पण ही इमारत चक्क स्वतःभोवती फिरते. यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.
 
या इमारतीत बँक ऑफ आशियाचे कार्यालय आहे. तिला पूर्णतः संगणकीकृत रूप देऊन हा चमत्कार साधण्यात आला आहे. या इारतीमध्ये विविध अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1986मध्ये ही अद्‌भुत व देखणी इमारत पूर्णपणे बांधून तयार झाली होती. तिच्या निर्मितीवर त्यावेळी एक कोटी डॉलरच्या आसपास खर्च आला होता, असे सांगितले जाते. 20 मजल्यांच्या या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर बहुउद्देशीय हॉल, कार्यालये व प्रशिक्षण कक्ष उपलब्ध असून तिच्या वरच्या मजल्यांचा भाग कार्यालयीन वापरासाठी ठेवण्यात आला आहे. तिची बाह्य रचना व सजावट पाहिल्यावर जणू एखादा भल्यामोठ्या आकाराचा रोबोटच उभा असल्यासारखे वाटते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती