काय सांगता,नवीन फायबर ग्लास कॉम्पोजिट सिलेंडर(Composite Cylinder)आले

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (13:22 IST)
इंडियन ऑईलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रकारचे एलपीजी सिलेंडर लाँच केले आहे. त्याचे नाव कॉम्पजिट सिलेंडर (Composite cylinder) आहे. हे सिलेंडर तीन स्तरांमध्ये बांधण्यात आले आहे. आतून पहिला स्तर हाई डेंसिटी पॉलीइथिलीनचा बनलेला असेल. हा आतील थर पॉलिमरपासून बनवलेल्या फायबरग्लाससह कोट केलेला आहे. सर्वात बाहेरचा थर देखील HDPE चा बनलेला आहे.
 
कॉम्पोजिट सिलेंडर सध्या देशातील 28 शहरांमध्ये वितरीत केले जात आहे. यामध्ये अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरीदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, लुधियाना, म्हैसूर, पाटणा, रायपूर, रांची, संगरूर, सुरत, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर., तुमकूर, वाराणसी आणि विशाखापट्टणम आहे. 5 आणि 10 किलो वजनामध्ये कॉम्पोजिट सिलेंडर येत आहे. हे सिलिंडर लवकरच देशातील इतर शहरांमध्येही पुरवले जाईल.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती