यवतमाळ मध्ये पुराच्या पाण्यात एसटीची बस वाहून गेली

मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (10:02 IST)
सध्या गुलाबी चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.पावसाने राज्याचे काही भाग झोडपून काढले आहे. सलग दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे.काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.असा पाऊस असताना पुराच्या पाण्यातून वाहने येजा करतात.यवतमाळ येथे पुराच्या पाण्यातून एसटी बस काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला आहे.

सकाळी नांदेडहून पुसंदमार्गे नागपूर जाणारी बस उमरखेडपासून दहागांवनाला पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेली.बस चालकाने पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही.त्या बस मध्ये पाच जण असल्याची माहिती मिळत आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहे.या बस मधील दोघे जण झाडावर चढून बसलेले आहे.तर काही बसच्या टपालावर चढून बसले आहे.त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहे.बस चालक आणि वाहक हे देखील त्या पुराच्या पाण्यात अडकले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,बस चालकाच्या अति आत्मविश्वासामुळे लोकांचा जीव धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती