तळीरामांसाठी खुषखबर! नाशकात आता घरपोच मिळणार दारु

शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (23:02 IST)
मद्यपींना आता घरपोच दारु मिळणार आहे. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लायसन्स आवश्यक असणार आहे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ही सेवा मद्यपींना मिळणार आहे. नाशिक जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॅा. मनोहर अंचुळे यांनी याबाबत माहिती दिली. 
 
विभागाकडून व्हाॅटसअॅप नंबर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याद्वारे मद्याची ऑर्डर घेतली जाणार आहे. त्यानंतर मद्याची डिलेव्हरी घरपोच होणार आहे. यासाठी शासनाचे सर्व नियम व अटी पाळून ही विक्री करता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती