म्यानमारमध्ये भूकंपात मृतांची संख्या 1002 वर पोहोचली, 2376 जखमी, भारता कडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु

शनिवार, 29 मार्च 2025 (12:59 IST)
शुक्रवारी (28 मार्च) म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. एकट्या म्यानमारमध्ये भूकंपात 1002 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या भूकंपात आतापर्यंत 2300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 30 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. 
ALSO READ: पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी अफगाणिस्तान हादरला तीव्रता 4.3 होती
दुसरीकडे, थायलंडमध्ये भूकंपामुळे सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या अचानक आलेल्या आपत्तीनंतर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या भयानक भूकंपाचा परिणाम केवळ म्यानमारमध्येच नाही तर शेजारील देशांमध्येही जाणवला. भारत, चीन आणि नेपाळसह पाच देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मदत साहित्य पाठवले आहे. हवाई दलाचे विमान C-130 J सुमारे 15 टन मदत साहित्य घेऊन यंगूनला पोहोचले आहे.
ALSO READ: Earthquake: म्यानमारमध्ये जोरदार भूकंप, 12 मिनिटांत दोनदा जमीन हादरली, बॅंकॉक पर्यंत धक्के जाणवले
म्यानमार व्यतिरिक्त थायलंड, चीन, नेपाळ आणि भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी रात्री म्यानमार आणि अफगाणिस्तानात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानात पहाटे 5:16 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.7 होती. वृत्तसंस्था एएफपीने म्यानमार आर्मी (जुंटा) च्या हवाल्याने म्हटले आहे की भूकंपात आतापर्यंत 694 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1670 लोक जखमी झाले आहेत. 
ALSO READ: न्यूझीलंडमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, भूकंपाची तीव्रता 6.5 मोजली गेली
म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे, परंतु सर्वत्र ढिगाऱ्यांचे ढीग, तुटलेले रस्ते आणि कोसळलेल्या इमारती दिसत आहेत. रुग्णालयांमध्ये जखमींची संख्याही हजारोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती