महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: राज ठाकरेंच्या मनसेची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Webdunia
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पक्ष नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून या यादीतील 13 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार  राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतील 13 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहे. तसेच यापूर्वी मनसेने 22 ऑक्टोबर रोजी दोन उमेदवार उभे केले होते आणि  45 उमेदवारांची यादी जाहीर केली.
 
 
तसेच मनसेने शहादामधून आत्माराम प्रधान, वडाळ्यातून स्नेहल सुधीर जाधव, कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जैस्वाल यांना उमेदवारी दिली असून 22 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत मनसेने कल्याण ग्रामीणमधून राजू रतन पाटील आणि ठाणे शहरातून अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली होती.
 
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी 16 जागा मुंबईतील आहे. या यादीत पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख