मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करा,मगच विधानसभा निवडणूकीचा प्रचार करा- उद्धव ठाकरे

शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (11:49 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अद्याप तारखा जाहीर केल्या नाही. महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोणाचा असेल. हे पाहणे उत्सुकताचे आहे. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत जाहीर केले की मुख्यमंत्रीचे नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चन्द्र पवार पक्षाने जाहीर करावे. माझा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. 

त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, आधी मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा जाहीर करा मगच विधानसभा निवडणुकीचा प्रचार करा.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आघाडीच्या एमव्हीए पदाधिकाऱ्यांची एक परिषद शुक्रवारी मुंबईतील षडमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते म्हणाले, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली निवड जाहीर करावी.

कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी आले आमचे त्यांना पूर्ण समर्थन असेल. पण मुख्यमंत्रीपदासाठी चेहऱ्याचे नाव जाहीर न करता विधानसभा निवडणूक लढवणे धोकादायक होऊ शकते. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती