Baramati News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. ताज्या ट्रेंडमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहे. तसेच अजित पवार यांच्या या संभाव्य विजयाबद्दल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आनंद व्यक्त केला असून त्याबद्दल बारामतीकरांचे आभार मानले आहे.
सुनेत्रा म्हणाल्या की, “अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता आणि बारामतीसाठी हा खूप भाग्याचा दिवस आहे. अजित दादांना पाठिंबा दिल्याबद्दल मी बारामतीच्या जनतेचे आभार मानते.” यासोबतच हा विजय बारामतीच्या जनतेचा विजय असून, अजित पवार हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री व्हावेत, अशी येथील जनतेची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या.